१२ ऑक्टोबर २०१९

अभिलेख वर्गीकरण


             शासकिय काम आणि बारा महिने थांबअशी सार्वत्रिक तक्रार सामान्य जनमाणसातुन नेहमीच ऐकायला मिळते. शासकिय काम वेळेत होणेसाठी शासन स्तरावर शुन्य प्रलंबिता आणि दैनंदिन निर्गती अभियान ( Zero Pendency & Daily Daily Disposal Campain)  या उपक्रम तत्पर प्रशासनासाठी राबविण्यात येत आहे.  सदरचे अभियान समर्थपणे राबविण्यासाठी अभिलेख वर्गीकरण करणे क्रमप्राप्त आहे. सदर उपक्रमामध्ये  अभिलेख अद्यावतीकरण करणे, अबकड यादी करणे, सहा गठ्ठा पध्दती आणि अभिलेख कक्षाचे अद्ययावतीकरण करणे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सदर मुद्दयांचा विचार करुन अभिलेख वर्गीकरण करणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज ग्रामपंचायतींकडे येत असल्याने अर्जाव्दारे मागणी केलेली माहितीचा शोध घेताना आपला महत्त्वाचा वेळ वाया जात असतो. अभिलेख वर्गीकरण अद्यावत केलेले असेल तर माहिती शोधणे सुकर होईल व कामकाजामध्ये गतिमानता येण्यास मदत होईल.
              तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुन्यांचे वर्गीकरण कोणत्या वर्गामध्ये होते याबाबत माहिती देण्यात येणार आहे. अभिलेख जतन करुन ठेवण्यासाठी  अबकड लिस्ट प्रमाणे कालावधी निश्चित केलेला असुन त्याप्रमाणे अभिलेखांचे निंदणीकरण (sorting) आणि वर्गीकरण (classification) करण्यात यावे आणि खालीलप्रमाणे अभिलेख कक्षात जतन करुन ठेवावेत.
अ वर्ग- कायमस्वरुपी- (लाल रंग)
ब वर्ग- 30 वर्षापर्यंत-(हिरवा रंग)
क वर्ग-10 वर्षापर्यंत -(पिवळा रंग)
क-1 - 5 वर्षापर्यंत-  (सफेद रंग)
ड- एका वर्षापर्यंत.     - (सफेद रंग)             
( अभिलेख किंवा कागदपत्रे निकालात काढण्यात येईपर्यंत  किंवा पंचायतीची वार्षिक हिशोब  तपासणी पुर्ण होईपर्यंत, हिशोबतपासणीच्या हरकती अंतिमरीत्या निकालात होईपर्यंत  जतन करुन ठेवावे.)


1 ते 33 नमुन्यांचे वर्गीकरण- 1 ते 33 नमुन्यांची  वर्गवारी पाहण्यासाठी कृपया खालील लिंक वर्ग क्लिक करावे.


टिप-1 ते 33 नमुन्यांव्यातिरिक्त अभिलेखांचे वर्गीकरणाची वर्गवारी पाहण्यासाठी मुंबई ग्रामपंचायत                ( अभिलेखांचे वर्गीकरण, परिरक्षण आणि नाशन ) नियम, 1970 चे अवलोकन करावे.

अभिलेख वर्गीकरणाबाबत महत्वाचे नियम/शासन निर्णय-




4.अभिलेख वर्गीकरण PPT



 पोस्ट आवडल्यास COMMENTS करा.
                        SHERE  करा    FOLLOW करा.

धन्यवाद !!😃😃




२ टिप्पण्या:

D N Talavadekar म्हणाले...

धन्यवाद सर �� माहिती खूपच उपयुक्त आहे अश्याच प्रकारे आपल्या ग्रामसेवक मित्रांना माहिती देत जा तसेच जर तुम्हाला youtube चॅनल बनवता आला तर नक्की विचार करा आणि व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या ग्रामसेवक मित्रांना अशीच मदत करत राहा आपल्या या उपक्रमास माझ्या तर्फे मनापासून शुभेच्छा

Unknown म्हणाले...

खुप उपयुक्त माहिती.
धन्यवाद भाऊसाहेब!