
महत्त्वाच्या आद्यावली
पंचायती राज संस्थांच्या कामात पारदर्शकता व सुसूत्रता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायातीराज मंत्रालयाने ई-पंचायत हा Mission Mode Project सर्व राज्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रकारच्या कामकाजाशी निगडीत असलेल्या एकूण अकरा प्रकारच्या आज्ञावली पंचायतीराज मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय सूचना केंद्र (NIC) नवी दिल्ली यांच्या मदतीने बनविलेले आहेत.
https://lgdirectory.gov.in
सर्व पंचायत राज संस्थांना विशिष्ट संकेतांक देवून सलग्न आज्ञावलीसाठी वापरात आणणे, ई पंचायत अंतर्गत सर्व Software ला लागणारा Basic Data हा पंचायत राज डिरेक्टरी मध्ये दर्शविला जातो. तसेच लोकसभा व विधानसभा मतदार संघाचे mapping या आज्ञावलीमध्ये केले जाते.
(National Panchayat Profiler)
https://areaprofiler.gov.in
या आद्यावलीमध्ये पंचायत राज संस्थेच्या लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची माहीती , गावाचे भौगोलिक क्षेत्र, सामजिक, आर्थिक, भौतिक सोई-सुविधा, विकासकामे व गावातील कुटुंबांची माहीती, पर्यटन विषयक माहिती यांचे एकत्रित व्यवस्थापन असते.
2.Plan Plus -
www.planningonline.gov.in
या आज्ञावलीमध्ये पंचायतीच्या विकास आराखड्याच्या नियोजनाबाबत माहिती अपलोड केली जाते. त्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम, सार्वजनिक विकासकामे, लोकाभिमुख कार्यक्रम इत्यादी प्रकारच्या कामांचे नियोजन, खर्चाची तरतूद यांचा आराखड्याच्याबाबत माहिती या आज्ञावलीमध्ये सामिविष्ठ असते.
निधीचे सूक्ष्म नियोजन व निधीचा पुरेपूर विनियोग व नियंत्रण हा या आज्ञावलीचा मूळ उद्देश आहे.
4.PRIA Soft
https://accountingonline.gov.in
पंचायती राज स्तरावर म्हणजे जिल्हा परिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या जमा व खर्चाचे लेखे व त्या अनुषंगिक सर्व अहवाल यांची माहिती या आज्ञावलीमध्ये असते. लेख्यांमध्ये अचूकता, पारदर्शकता व तत्परता आणणे हा महत्वाचा उद्देश या आज्ञावलीचा आहे.
5. ACTION Soft
http://reportingonline.gov.in/
पंचायत राज संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीबाबतची माहिती या आज्ञावलीमध्ये असते . कामाची भौतिक व वित्तीय प्रगती याबाबतची अद्यावत माहिती लोकांना मिळावी हा उद्देश या आज्ञावलीचा आहे.
6.National Asset Directory
https://assetdirectory.gov.in/
पंचायत राज संस्थांच्या समालकीच्या तसेच आधिपत्याखालील सर्व जंगम व स्थावर मालमत्तांची माहिती या आज्ञावलीमध्ये असते.
7. SOCIAL AUDIT
https://socialaudit.gov.in/
8.SARVICE PLUS
https://serviceonline.gov.in/
पंचायती राज संस्थांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा (प्रमाणपत्र /दाखले) या SEFTWARE रहिवाशी क्षेत्रातच उपलब्ध होणार आहेत.
9.TRAINING MANAGEMENT
https://trainingonline.gov.in/
पंचायातीराज संस्थांच्या कारभाराशी निगडीत सर्व संबंधितांच्या प्रशिक्षणाचे online व्यवस्थापन या आज्ञावली केले जाते.
10.NATIONAL PANCHAYAT PORTAL
https://panchayatonline.gov.in/
सर्व पंचायातीराज संस्थांची संकेतस्थळे व त्या सलग्न सर्व माहिती या आज्ञावलीमध्ये असते.
11.GIS Layer
बेसिक GIS प्रणाली
सर्व पंचायती राज संस्थांचा परिपूर्ण तथा सर्वसमावेशक भौगोलिक नकाशा व त्या अनुषंगाने विविध योजनांच्या नियोजनास माहिती उपलब्धता.
सर्व प्रकारच्या आज्ञावली ह्या PUBLIC DOMAIN वर असल्याने त्यामध्ये चुकीची व सदोष माहिती भरल्यास संबधित अधिकारी /कर्मचारी यांच्यावर कारवाई ची तरतूद केलेली आहे. त्यामुळे सर्व ग्रामसेवक यांना विनंती आहे कि त्यांनी या सर्व आज्ञावलीचे USER ID व PASSWORD आपल्या जवळ ठेवावेत व सदोष माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
धन्यवाद !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा