०४ सप्टेंबर २०२५

पंचायत विकास निर्देशांक PAI संबंधित NIRNNAY APP वर ग्रामसभा कशी शेड्युल करावी?

 


🟢निर्णय अँप वर पंचायत विकास निर्देशांक (PAI) ग्रामसभा कशी घ्यावी?

🟢ग्रामसभा शेड्युल कशी करावी?

📌 प्रथम प्ले स्टोअर वरून  *pancha

yat nirnay app* download करावे. Egram swarajy portal चे ADMIN login वापरून login करावे.

📌 login केल्यानंतर App च्या home page वर one time registration- master data मध्ये meeting venue management टॅब वर click करून add venue करावे.

🔸meeting venue photo upload करताना इमारतीचे नाव स्पष्ट दिसेल असा photo घ्यावा.

📌 one time registration- master data मध्ये 3 नंबर टॅब meeting Invitee management मधून ज्यांना सभेला बोलवायचे आहे त्यांना  रजिस्टर करून घ्यावे. यापूर्वी meeting Invitee add केलेले असल्यास पुन्हा add करण्याची आवश्यकता नाही.   ER person

 आणि karmachari प्राधान्याने add करून घ्यावे.

📌 one time registration- master data मध्ये 4 नंबर टॅब *Schedule new meeting* या टॅब वर click करून Schedule तयार करावे. यामध्ये meeting date, timing, meeting venue select करून घ्यावे.  

🔸 select meeting type मध्ये PAI-Discussion & approval of PAI data

Select करावे.

त्यानंतर meeting title, meeting Discription add करावे. त्यानंतर सही शिक्का केलेली meeting notice copy upload करावी. यामध्ये  नोटीसीमधील text स्पष्ट दिसेल असा photo घ्यावा.

Schedule and publish Meeting notice ला click करावे.

📌 click केल्यानंतर meeting detail दिसेल. 

त्याच्या खाली add chairperson option दिसेल त्यामध्ये meeting chairperson  detail भरून घ्यावे व submit करावे.

🔸 त्यानंतर add invitee टॅब वर click करून invitee select करून घ्यावे.

🔸 register agenda items for discussion वर click करावे. Click केल्यानंतर agenda detail मध्ये ajenda वर click करून drop down list मधून PAI : Diacussion on PAI data select करून घ्यावे व त्याखालील select sgd theme मधून PDI select करावे व  Upload Agenda note on Server वर click करावे. 

🔸त्यानंतर signed & stamped copy of agenda वर click करून agenda copy photo upload करावा व Upload Agenda note on Server वर click करावे. (Text clear दिसेल असा photo असावा)

   एवढं केल्यानंतर आपलं मिटिंग शेड्युल पूर्ण होईल.

🟢आता प्रत्यक्ष मिटिंग च्या दिवशी काय करावे?

📌 Nirnay App login करून home page वर meeting attendance & Decision Management या टॅब वर click करावे. Click केल्यानंतर आपण schedule केलेले gramsabha meeting details दिसतील.त्यामध्ये PAI संबंधित ग्रामसभेमध्ये pending task वर click करावे. 

🔸Click केल्यावर Register attendance टॅब दिसेल त्यावर click करून आपण यापूर्वी invitee मधून invite केलेल्या मधून जेवढे invitee सभेला उपस्थित असतील त्यांना select करून submit करावे.

🔸त्यानंतर upload signed & stamped copy of attendance sheet वर click करून उपस्थिती रजिस्टर चा स्पष्ट photo upload करावा.

🔸यानंतर register meeting quorom वर click करावे. व उपस्थितांची प्रवर्ग निहाय उपस्थिती नोंदवावी. व submit बॅटनावर click करावे.

🔸यानंतर Register Decisions & Minutes of the meeting वर click करून decision points व decision taken बाबत माहिती भरून submit वर click करावे.

🔸त्यानंतर upload signed & stamped copy of  Decisions/ Minutes वर click करून upload copy of decision copy वर click केल्यावर comera open होईल त्यामध्ये photo घेऊन decision copy upload करावी.

🔸🔹 वरील प्रमाणे ऑनलाईन प्रोसेस करताना आपल्याला meeting मधील photo व 5 प्रकारचे video live upload करायचे आहेत.

Photo व video upload करण्यासाठी अँप च्या home page वर photo & video management मध्ये meeting photos व meeting video वर click करावे.  Photo upload करताना capture photo किंवा upload photo वर click करून photo upload करून घ्यावेत. यामध्ये meeting photo व group photo upload करून घ्यावेत. 🔹सगळ्यांत महत्वाचे आहे ते meeting videos. यामध्ये मीटिंग च्या live video करायच्या आहेत. 

यामध्ये

1. Welcome and reading out the agenda of gramsabha (2 minutes duration)

2. Review of the decision taken in the previous meeting (5 minutes duration)

3. Key decision taken during current meeting (5 minutes duration)

4. Others ( any others decision)  (2 minutes duration)

5. Votes of thanks (1 minutes duration) अशा 5 video करून upload करायचा आहेत.


Record meeting video वर click करून वरील प्रमाणे video करून video upload करून videos send to publish करावे.

 वरील प्रमाणे प्रोसेस केलेनंतर PAI data nirnay app मधून verified होईल व data calculation साठी submit होईल. 


        शशिकांत तांबे

   ग्रामपंचायत अधिकारी

१७ सप्टेंबर २०२३

ग्रामपंचायत विकास आराखडा 2024-25

 


नमस्कार ,

ग्रामपंचायत विकास आराखडा सन 2024 -25  तयार करणेबाबत. व सबकी योजना, सबका विकास मोहीम  राबविण्याबाबत , दिनांक. 9 ऑगस्ट 2023 रोजी शासनाकडून शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.

सदर शासन परिपत्रकानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना.


1. संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा.

 thematic G P D P

    संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा या संकल्पनेनुसार आपल्याला सन 2030 पर्यंत  संपूर्ण 9 थीम मधील 100% उपक्रम पूर्ण करायच्या आहेत.              सन 2023 चा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना आपण शासनाच्या सूचनांनुसार जलसम्रुद्ध गाव. व हरित आणि स्वच्छ गाव. या थीम वर काम करून 50 टक्के उपक्रम  पूर्ण केलेले आहेत. तरी सन 2024-25 चा आराखडा तयार करताना वरील 2 थीम मधून उर्वरित 50% उपक्रम  व इतर 7 थीम  यांचा विचार करून आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. 

2.संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा. तयार करणेबाबत दिनांक. 11 जानेवारी 2023 च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांचे पालन करणे.

      या परिपत्रकामध्ये वित्त आयोगाच्या 60% बंधित निधीतून जलसम्रुद्ध गाव व स्वच्छ व हरित गाव या संकल्पनावर  50% खर्च करणे. व अबंधित निधीमधून ग्रामसभेने निवडलेल्या,  1 किंवा 2 थीम मधील उपक्रमांवर  वर 50% खर्च करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ग्रामसभेने निवडलेल्या थीम ची माहिती  vibrant gramsabha पोर्टल वर करणे आवश्यक.

3. शासनाच्या दिनांक 29 नोव्हेंबर 2022 व 11 जानेवारी 2023 च्या पत्रान्वये  2 ग्रामसभा  घेणे  बंधनकारक आहे. 

दोन्ही ग्रामसभांचे वेळापत्रक vibrant gram sabha  पोर्टल वर भरणे आवश्यक.

4.  पहिल्या ग्रामसभेपुर्वि महिला सभा, वार्ड सभा , बाल सभा . व  वंचित घटकांची सभा या चार सभा घ्यावयच्या आहेत.             

 चार सभांमध्ये घ्यायचे विषय

   1. सन 2023-24 या वर्षाचा भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल

2. सन 2025 या वर्षाच्या आराखड्यासाठी  9 संकल्पने अंतर्गत ई- ग्राम स्वराज पोर्टलवर नमूद उपक्रमांची यादी.

3. सन 2024  25 या वर्षाच्या आराखड्याच्या नियोजनासाठी उपलब्ध होणारा एकूण निधी. (वित्त आयोग, स्वनिधी, मग्रारोहयो, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, ५% ग्रामकोष निधी, लोकवर्गणी इ.)

4. पंधराव्या वित्त आयोगाच्या ६०% बंधित निधीमधून घ्यावयाचे उपक्रम.

5. पंधराव्या वित्त आयोगाच्या ४०% अबंधीत निधीमधून ५०% निधी 2 निवडलेल्या संकल्पने अंतर्गत,  पोर्टल वरील ५०% उपक्रमांवर करणेबाबत माहिती.

6. ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये राज्य व केंद्र शासनाच्या प्रमुख (Flagship) योजना, कार्यक्रमांची माहिती.

7. गाव गरिबी निर्मुलन आराखडा.

8. मिशन अंत्योदय सर्व्हेक्षण अहवाल.

इत्यादी विषय वरील सभांमध्ये ठेवणे आवश्यक आहेत.

        वरील प्रमाणे सभा पूर्ण झाल्यानंतर ग्रामविकास आराखडा तयार करणेची पहिली ग्रामसभा आयोजित करण्यात यावी.

ग्रामसभेमध्ये वरील विषयांसह पुढील विषय  ठेवण्यात यावेत.

 1. महिला, वॉर्ड, बाल व वंचित घटकांच्या सभेमधील ठराव व शिफारशी.

2.शाळा विकास आराखडा.

3.अंगणवाडी अहवाल.

4. प्रारूप ग्राम पंचायत विकास आराखड्यास मान्यता देणे.

        वरील प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर प्रारूप  ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून तालुका स्तरावर तांत्रिक छाननी समितीकडे सादर करणेत यावा. तांत्रिक छाननी समितीने, छाननी करून दिलेला प्रारूप आराखडा अंतिम मान्यतेसाठी ग्रामसभेमध्ये ठेवणेत यावा . ग्रामसभेने अंतिम मान्यता दिलेला आराखडा इ ग्राम स्वराज्य पोर्टलवर दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी अपलोड करणेत यावा.

https://youtu.be/qvgYcJHIgHY

 👉 ग्रामपंचायत विकास आराखडा 2024-25 कसा        तयार करावा

 👉  gramsabha

 👉 egramswaraj.gov.in

 


 


०३ सप्टेंबर २०२३

ई निविदा कालावधी

ई-निविदा प्रणाली अंतर्गत अल्प कालावधीची निविदा सूचना प्रसिद्ध करण्याबाबत...

शासन निर्णय पाहण्यासाठी क्लिक करा

https://youtu.be/yP0rtj-teOo



२७ ऑगस्ट २०२०

विकासकामातील कपाती

  

                     ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कामकाज करताना विशेषत: विकासकाम करताना नेहमीच ग्रामसेवकांना ग्रामस्थांच्या तक्रारींना सामोरे जावे लागते . मग त्यातून तक्रारी होऊन चौकशीला सामोरे जावे लागते आणि चौकशी मध्ये सदर कामाची निविदा प्रक्रिया , कामाचा दर्जा , ठेकेदार  याच बरोबर कामापोटी अदा केलेली रक्कम या सर्व बाबींचा उहापोह केला जातो. यापूर्वीच्या पोस्ट मध्ये आपण निविदा प्रकिया बाबत चर्चा केली होती. या पोस्ट मध्ये आपण विकासकामामधून होणार्‍या वजावटीबाबत माहिती घेणार आहोत. आशा आहे की , सदर माहितीचा उपयोग आपल्याला  दैनंदिन काम करताना निश्चितच होईल.  

✂ विकासकामाच्या देयकापोटी मक्तेदार यांना रक्कम अदा करताना खालीलप्रमाणे वजावटी (कपाती ) करणे आवश्यक आहे.✂

आयकर - 1% (एक व्यक्ति किंवा एक एकत्रित कुटुंब )    आयकर कलम 194 C 

2 % फर्म किंवा इतर 

रॉयल्टी -(वसूली पत्रकानुसार )

कामगार विमा -1%

कामगार कल्याण निधि (उपकर ) -  1 %

जी एस टी (टीडीएस )- 2% (2.50 लाख रकामेच्या वरील देयकावर )

ग्रा पं बचत - 5%  ( ग्रा पं ठरावानुसार ठरवून घ्यावी )

सुरक्षा अनामत रक्कम - 5%


👉कपात केलेली रक्कम कोठे व कशी भरणा करावी ?

अक्र

कपात करावयाची बाब

कपात रक्कम भरणा 

1

आयकर

स्टेट बँक ऑफ इंडीया मध्ये चलन क्र.281 ने चेक किंवा धनाकर्षाव्दारे भरणा करावी

2

अनामत रक्कम

संबधित रोजकिर्दीमध्ये चेकने जमा करावी किंवा by adjestment

3

गौणखनिज (वसुलीपत्रकानुसार)

सदरच्या रक्कमेचा धनाकर्ष (SBI) सिंधुदुर्गनगरी ओरोस शाखेचा काढुन मा.जिल्हाधिकारी गौणखनिज सिंधुदुर्ग यांना सादर करावा.

4

कामगार विमा G.I.S

विमा संचालक,महाराष्ट्र राज्य मुंबई गृहनिर्माण भवन म्हाडा 264 पहिला मजला कनानगरसमोर, वांद्रे  (पुर्व) मुंबई 400051 यांचे नावे धनाकर्ष काढुन पाठवावा.

5

सेस (कामगार कल्याण मंडळ)

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडीया खाते क्र.444302010104920

6

जी एस टी

ऑनलाईन  चलन काढुन बँकेत भरणा करणे

7

ग्रा.पं बचत

चेकने ग्रामनिधीकडे













 पोस्ट आवडल्यास COMMENTS करा.
                        SHERE  करा    FOLLOW करा.

धन्यवाद !!😃😃




०७ नोव्हेंबर २०१९

आमचा गाव आमचा विकास आराखडा सन 2020-21 ते 2024-25



              ‘आमचा गाव आमचा विकासया उपक्रमांर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी तीन वर्षापुर्वी मार्गदर्शक सुचंनाप्रमाणे लोकसहभागीय नियोजन प्रक्रिया पार पाडुन पंचवार्षिक व वार्षिक विकास आराखडे तयार केलेले आहेत. या प्रक्रियेचा अनुभव व केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सन 2020-21 ते 2024-25 या कालावधीसाठी पंचवार्षिक आराखडा व सन 2020-21 चा वार्षिक आराखडा अंतिम करणेचा कार्यवाही करणेची आहे.
        आराखडा तयार करताना मागील आराखड्यातील शिल्लक कामे, गावाच्या आणखी गरजा, आवश्यकता,  गावक-यांचे पुढील नियोजन यांचा विचार करुन ग्रामसभेमध्ये प्राधान्यक्रम निश्चित करावयाचा आहे.ग्रामपंचायतीने पुढील पाच वर्षामध्ये  उपलब्ध  स्त्रोतामधुन (ग्रामनिधी) प्राप्त होणा-या उत्पन्नाच्या/ निधिच्या दुप्पट/दिडपट रक्कमेचा आराखडा न करता  मुळ तरतुदीप्रमाणे आराखडा तयार करावा.परंतु 15 वा वित्त आयोगाच्या पाच वर्षामध्ये मिळणा-या निधीच्या दुप्पट पंचवार्षिक आराखडा व दिडपट वार्षिक आराखडा करावयाचा आहे.
पुर्वतयारी:-
ग्रामसभा 
1.ग्रामसभा नियोजन
1.1  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती गणनिहाय विस्तार अधिकारी यांची नेमणुक प्रभारी अधिकारी म्हणुन करणे तसेच प्रत्येक गणनिहाय मुख्यसेविका (ए.बा.वि.प्र) यांना प्रशिक्षित करणे.
1.2. ग्रामसभेमध्ये  आराखड्याबाबत चर्चा करताना खालीलप्रमाणे माहिती देणे आवश्यक आहे.
1.ग्रा.पं ने आतापर्यंत हाती घेतलेली कामे/उपक्रम,        त्यावर झालेला खर्च,शिल्लक निधी
2.पंचायतीस पुढील पाच वर्षात मिळणारे उत्पन्न व        इतर निधी.
3.यापुर्वी ग्रामसभेने सुचविलेली कामे/उपक्रम-            प्राधान्यक्रम.
4.गावाच्या गरजा, अडचणी यावरील               उपाययोजना.
5.केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची    अंमलबजावणी.
6.म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनांतर्गत चालु कामे/पुढील नियोजन.
                इत्यादीबाबत अद्यावत माहिती गोळा करणे व नियोजन करणे.
1.3  शासनाच्या विविध विभागाच्या अधिका-यांनी ग्रामसभेत उपस्थित राहुन आपल्या योजनांची माहिती देणेसाठी त्यांना आमंत्रित करणे.
1.4  शासनाच्या विविध विभागाच्या अधिका-यांनी ग्रामसभेत उपस्थित राहुन ग्रामसभेत द्यावयाची माहिती.
1.ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या विभागामार्फत चालु वर्षी घेतलेल्या योजना/उपक्रमांची
सद्यस्थिती.
2.विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजना.
3.ग्रा.पं मध्ये राबविलेल्या योजना, त्यांची सद्यस्थिती, उपलब्ध निधी व त्यामधील
अडचणी/त्रुटी.
4.योजनांमध्ये लोकांचा सहभाग.
5.योजनांच्या अमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीकडुन आवश्यक सहभाग.

1.5  ग्रामसभेमध्ये सर्व घटकांनी उपस्थित राहणेसाठी ग्रामसभेची प्रसिध्दी सर्व वाड्यांमध्ये करणे.
1.6  ग्रा.पं मार्फत राबविण्यात येणा-या योजना/उपक्रमांची माहिती तसेच ग्रा.प कडुन हाती घेण्यात आलेल्या योजना व उपक्रम यांची परीपुर्ण माहिती दर्शविणारे फलक गावामध्ये ठळक ठिकाणी लावणे.
1.7  पंचवार्षिक आराखडा व वार्षिक आराखडा करणेसाठी च्या ग्रामसभा दिनांक- 02 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करावयाच्या आहेत.
1.8  ग्रामसभेसाठी मा.गटविकास अधिकारी यांनी संपर्क अधिकारी यांची नेमणुक करणे.
2. महिला सभा, मागासवर्गीय व वंचित घटकांची सभा व बालसभा
        ग्रामसभेच्या आदल्या दिवशी या तीन सभा घेणेत याव्यात.
2.1 महिला सभा:-
       महिला सभा घेताना खालीलप्रमाणे विषयांवर चर्चा करणे आवश्यक आहे.
            1.ग्रामपंचायत विकास आराखडा चर्चा करणे
        2.राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटांनी          
       केलेल्या सुक्ष्म पत आराखडा.
3.ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना व सेवांच्या अंमलबजावणीमध्ये  
स्वंयसहाय्यता गट/योजनांचा सहभाग    
4.ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना वातावरण निर्मिती, जाणीव जागृती व
क्षमता बांधणीसाठी स्वयंसहाय्यता गट व महिलांचा सहभाग
5.महिला, बालके, स्वयंसहाय्यता गट यांच्या समस्या, अडचणी व त्या सोडविण्यासाठी
उपाययोजना.
2.2  गावातील मागासवर्गीय व वंचित घटकांची सभा:-
         वंचित घटक, मागासवर्गीय, विधवा व परितक्ता महिला, अपंग, शेतमजुर यांच्या सभा घेणे. त्यांच्या समस्या, अडचणी, गरजा व यावर उपाययोजनांवर चर्चा करणे.
2.3 बालसभा:-
1. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची सभा घेऊन शिक्षण, आरोग्य,स्वच्छता, पिण्याचे पाणी, विविध स्वरुपाचे दाखले इत्यादी बालकांविषयीच्या सर्व गरजा व मागण्या यावर चर्चा करणे.
2.बालविवाह, बालमजुर, बालशोषण, बालहिंसा यापासुन संरक्षण करण्याबाबतच्या
उपाययोजना.
3.पुर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा व त्यापुढील शिक्षणाच्या सोयी.
4. गावातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर महिलांच्या पोषणाबाबत
आवश्यक ती उपाययोजना.
वरीलप्रमाणे 1 व 2 मुद्यांच्या अनुषंगाने परीपुर्ण माहितीसह मुख्य ग्रामसभेचे नियोजन करण्यात यावे व आमचा गाव आमचा विकासउपक्रमांतर्गत सन 2020-21 ते 2024-25 पंचवार्षिक आराखडा व सन 2020-21 वार्षिक आराखडा तयार करणेत यावा.
प्रत्यक्ष आराखडा तयार करणे त्याचा प्राधान्यक्रम ठरविणे याबाबतची माहिती यापुढील पोस्ट मध्ये देण्यात येईल. तर मित्रानो  आपल्या माहितीत भर घालण्यासाठी व नेहमी अपडेट राहण्यासाठी  सर्च करा https://gramsevakmitra.blogspot.com    ग्रामसेवक मित्र  या ब्लॉगला  follow 🔔 करा  आणि ब्लॉग आवडल्यास comments ☝☝☝ करा.
धन्यवाद !! 😃😃

२३ ऑक्टोबर २०१९

निविदा प्रक्रिया

          शासकिय व्यवस्थेमध्ये कोणतेही  विकासकाम करावयाचे झाल्यास त्याची कायदेशीर निविदा प्रक्रिया केली जाते. विकासकामांमध्ये बांधकाम, साहित्य व सेवा या तीन प्रकारच्या कामांचा समावेश होतो.विशिष्ट कामांवर किती रक्कम खर्च होणार आहे, यावर निविदा प्रक्रिया पध्दती अवलंबुन असते. कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया पध्दतीचा अवलंब करताना त्याबाबतची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरुन निविदा प्रक्रिया करताना किरकोळ स्वरुपाच्या त्रुटी राहणार नाही व योग्य प्रकारची निविदा प्रक्रिया पध्दती अवलंब केल्याने भविष्यात होणा-या तक्रारी तसेच लेखा परिक्षण आक्षेप कमी होतील.
निविदा प्रक्रिया पध्दती-
1. बांधकाम
अक्र
कामाची रक्कम
पध्दती
1.
50 हजार रु.पर्यंतचे काम      
कार्यालयीन स्तरावरुन निविदा.
2.
50 हजार रु.पेक्षा जास्त व
3 लाख रु. पर्यंतचे काम            
स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करुन निविदा मागविणे.                 
3.
3 लाख रु.पेक्षा जास्त किंमतीचे
 काम                               
ई.टेंडरच्या माध्यमातुन ऑनलाईन खुली निविदा मागवुन.

निविदा फी-
निविदा रक्कम
फी
5 लाखापर्यंत
100 रु.
05  लाख ते 10 लाख
200 रु.
10 लाख ते 15 लाख
500 रु.
15 लाख ते 50 लाख
1000 रु.
50 लाख ते 2 कोटी
5000 रु.
2 कोटी ते 5 कोटी
10000 रु.

बयाणा रक्कम-
      निविदा रक्कमेच्या 1 टक्का. बयाणा रक्कम 1 लाखापेक्षा जास्त असल्यास बँक गॅरंटी घेणेचा पर्याय आहे.e-tender केलेल्याकामांची बयाणा रक्कम online भरणा करणे आवश्यक आहे.
सुरक्षा अनामत रक्कम:-
      5 टक्के घेणे आवश्यक आहे.

2.साहित्य:-
अक्र
कामाची रक्कम
पध्दती
1.
5 हजार रु.पर्यंतची खरेदी
थेट जाग्यावर (सदर वस्तुची किंमत आर्थिक वर्षात 50 हजारपेक्षा जास्त नसावी.)
2.
50 हजार रु.पेक्षा जास्त ते
3 लाख रु. पर्यंत            
खुल्या बाजारातुन किमान तीन दरपत्रक मागवुन (सदर वस्तुची किंमत आर्थिक वर्षात 3 लाखांपेक्षा जास्त नसावी.)             
3.
3 लाख रु.पेक्षा जास्त किंमतीचे
 साहित्य                               
ई.टेंडरच्या माध्यमातुन ऑनलाईन खुली निविदा मागवुन.

निविदा फी-साहित्य
निविदा रक्कम
फी
5 लाखापर्यंत
1000 रु.
05  लाख ते 10 लाख
2000 रु.
10 लाख ते 50 लाख
3000 रु.
50 लाख ते 1 कोटी
10000 रु.
1 कोटी पेक्षा जास्त
सर्व अधिकार संबधित  विभागास

बयाणा रक्कम-साहित्य
निविदा रक्कम
बयाणा रक्कम
5 लाखापर्यंत
5000 रु.
05  लाख ते 10 लाख
10 हजार रु.
10 लाख ते 50 लाख
50 हजार रु.
50 लाख ते 1 कोटी
1 लाख रु.
1 कोटी पेक्षा जास्त
सर्व अधिकार संबधित  विभागास
 
सुरक्षा अनामत रक्कम:-
      3 टक्के घेणे आवश्यक आहे.

निविदा प्रसिध्दी कालावधी:-
निविदा रक्कम
प्रथम
व्दितीय
तृतीय
50 हजार
08 दिवस
05 दिवस
03 दिवस
50 हजार ते 3 लाख
08 दिवस
05 दिवस
03 दिवस
3 लाख ते 50 लाख
15 दिवस
08 दिवस
05 दिवस
50 लाख ते 25  कोटी
25 दिवस
15 दिवस
10 दिवस
25 कोटी ते 100 कोटी
25 दिवस
25 दिवस
15 दिवस
100 कोटीच्या पुढे
45 दिवस
30 दिवस
30 दिवस