नमस्कार ,
ग्रामपंचायत विकास आराखडा सन 2024 -25 तयार करणेबाबत. व सबकी योजना, सबका विकास मोहीम राबविण्याबाबत , दिनांक. 9 ऑगस्ट 2023 रोजी शासनाकडून शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
सदर शासन परिपत्रकानुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना.
1. संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा.
thematic G P D P
संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा या संकल्पनेनुसार आपल्याला सन 2030 पर्यंत संपूर्ण 9 थीम मधील 100% उपक्रम पूर्ण करायच्या आहेत. सन 2023 चा ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना आपण शासनाच्या सूचनांनुसार जलसम्रुद्ध गाव. व हरित आणि स्वच्छ गाव. या थीम वर काम करून 50 टक्के उपक्रम पूर्ण केलेले आहेत. तरी सन 2024-25 चा आराखडा तयार करताना वरील 2 थीम मधून उर्वरित 50% उपक्रम व इतर 7 थीम यांचा विचार करून आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.
2.संकल्पनाधारित ग्रामपंचायत विकास आराखडा. तयार करणेबाबत दिनांक. 11 जानेवारी 2023 च्या पत्रान्वये दिलेल्या सूचनांचे पालन करणे.
या परिपत्रकामध्ये वित्त आयोगाच्या 60% बंधित निधीतून जलसम्रुद्ध गाव व स्वच्छ व हरित गाव या संकल्पनावर 50% खर्च करणे. व अबंधित निधीमधून ग्रामसभेने निवडलेल्या, 1 किंवा 2 थीम मधील उपक्रमांवर वर 50% खर्च करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. ग्रामसभेने निवडलेल्या थीम ची माहिती vibrant gramsabha पोर्टल वर करणे आवश्यक.
3. शासनाच्या दिनांक 29 नोव्हेंबर 2022 व 11 जानेवारी 2023 च्या पत्रान्वये 2 ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.
दोन्ही ग्रामसभांचे वेळापत्रक vibrant gram sabha पोर्टल वर भरणे आवश्यक.
4. पहिल्या ग्रामसभेपुर्वि महिला सभा, वार्ड सभा , बाल सभा . व वंचित घटकांची सभा या चार सभा घ्यावयच्या आहेत.
चार सभांमध्ये घ्यायचे विषय
1. सन 2023-24 या वर्षाचा भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल
2. सन 2025 या वर्षाच्या आराखड्यासाठी 9 संकल्पने अंतर्गत ई- ग्राम स्वराज पोर्टलवर नमूद उपक्रमांची यादी.
3. सन 2024 25 या वर्षाच्या आराखड्याच्या नियोजनासाठी उपलब्ध होणारा एकूण निधी. (वित्त आयोग, स्वनिधी, मग्रारोहयो, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, ५% ग्रामकोष निधी, लोकवर्गणी इ.)
4. पंधराव्या वित्त आयोगाच्या ६०% बंधित निधीमधून घ्यावयाचे उपक्रम.
5. पंधराव्या वित्त आयोगाच्या ४०% अबंधीत निधीमधून ५०% निधी 2 निवडलेल्या संकल्पने अंतर्गत, पोर्टल वरील ५०% उपक्रमांवर करणेबाबत माहिती.
6. ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये राज्य व केंद्र शासनाच्या प्रमुख (Flagship) योजना, कार्यक्रमांची माहिती.
7. गाव गरिबी निर्मुलन आराखडा.
8. मिशन अंत्योदय सर्व्हेक्षण अहवाल.
इत्यादी विषय वरील सभांमध्ये ठेवणे आवश्यक आहेत.
वरील प्रमाणे सभा पूर्ण झाल्यानंतर ग्रामविकास आराखडा तयार करणेची पहिली ग्रामसभा आयोजित करण्यात यावी.
ग्रामसभेमध्ये वरील विषयांसह पुढील विषय ठेवण्यात यावेत.
1. महिला, वॉर्ड, बाल व वंचित घटकांच्या सभेमधील ठराव व शिफारशी.
2.शाळा विकास आराखडा.
3.अंगणवाडी अहवाल.
4. प्रारूप ग्राम पंचायत विकास आराखड्यास मान्यता देणे.
वरील प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर प्रारूप ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून तालुका स्तरावर तांत्रिक छाननी समितीकडे सादर करणेत यावा. तांत्रिक छाननी समितीने, छाननी करून दिलेला प्रारूप आराखडा अंतिम मान्यतेसाठी ग्रामसभेमध्ये ठेवणेत यावा . ग्रामसभेने अंतिम मान्यता दिलेला आराखडा इ ग्राम स्वराज्य पोर्टलवर दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी अपलोड करणेत यावा.
https://youtu.be/qvgYcJHIgHY
👉 ग्रामपंचायत विकास आराखडा 2024-25 कसा तयार करावा