ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कामकाज करताना विशेषत: विकासकाम करताना नेहमीच ग्रामसेवकांना ग्रामस्थांच्या तक्रारींना सामोरे जावे लागते . मग त्यातून तक्रारी होऊन चौकशीला सामोरे जावे लागते आणि चौकशी मध्ये सदर कामाची निविदा प्रक्रिया , कामाचा दर्जा , ठेकेदार याच बरोबर कामापोटी अदा केलेली रक्कम या सर्व बाबींचा उहापोह केला जातो. यापूर्वीच्या पोस्ट मध्ये आपण निविदा प्रकिया बाबत चर्चा केली होती. या पोस्ट मध्ये आपण विकासकामामधून होणार्या वजावटीबाबत माहिती घेणार आहोत. आशा आहे की , सदर माहितीचा उपयोग आपल्याला दैनंदिन काम करताना निश्चितच होईल.
✂ विकासकामाच्या देयकापोटी मक्तेदार यांना रक्कम अदा करताना खालीलप्रमाणे वजावटी (कपाती ) करणे आवश्यक आहे.✂
आयकर - 1% (एक व्यक्ति किंवा एक एकत्रित कुटुंब ) आयकर कलम 194 C
2 % फर्म किंवा इतर
रॉयल्टी -(वसूली पत्रकानुसार )
कामगार विमा -1%
कामगार कल्याण निधि (उपकर ) - 1 %
जी एस टी (टीडीएस )- 2% (2.50 लाख रकामेच्या वरील देयकावर )
ग्रा पं बचत - 5% ( ग्रा पं ठरावानुसार ठरवून घ्यावी )
सुरक्षा अनामत रक्कम - 5%
👉कपात केलेली रक्कम कोठे व कशी भरणा करावी ?
अक्र |
कपात करावयाची
बाब |
कपात रक्कम
भरणा |
1 |
आयकर |
स्टेट बँक ऑफ इंडीया मध्ये चलन क्र.281
ने चेक किंवा धनाकर्षाव्दारे भरणा करावी |
2 |
अनामत रक्कम |
संबधित
रोजकिर्दीमध्ये चेकने जमा करावी किंवा by
adjestment |
3 |
गौणखनिज (वसुलीपत्रकानुसार) |
सदरच्या रक्कमेचा धनाकर्ष (SBI)
सिंधुदुर्गनगरी ओरोस शाखेचा काढुन
मा.जिल्हाधिकारी गौणखनिज सिंधुदुर्ग यांना सादर करावा. |
4 |
कामगार विमा G.I.S |
विमा संचालक,महाराष्ट्र राज्य मुंबई गृहनिर्माण भवन म्हाडा 264
पहिला मजला
कनानगरसमोर,
वांद्रे (पुर्व)
मुंबई 400051 यांचे नावे धनाकर्ष काढुन पाठवावा. |
5 |
सेस (कामगार कल्याण
मंडळ) |
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ
यांच्या नावे युनियन बँक ऑफ इंडीया खाते
क्र.444302010104920 |
6 |
जी एस टी |
ऑनलाईन चलन
काढुन बँकेत भरणा करणे |
7 |
ग्रा.पं बचत |
चेकने ग्रामनिधीकडे |
SHERE करा FOLLOW करा.
धन्यवाद !!😃😃