०७ नोव्हेंबर २०१९

आमचा गाव आमचा विकास आराखडा सन 2020-21 ते 2024-25



              ‘आमचा गाव आमचा विकासया उपक्रमांर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीनी तीन वर्षापुर्वी मार्गदर्शक सुचंनाप्रमाणे लोकसहभागीय नियोजन प्रक्रिया पार पाडुन पंचवार्षिक व वार्षिक विकास आराखडे तयार केलेले आहेत. या प्रक्रियेचा अनुभव व केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सन 2020-21 ते 2024-25 या कालावधीसाठी पंचवार्षिक आराखडा व सन 2020-21 चा वार्षिक आराखडा अंतिम करणेचा कार्यवाही करणेची आहे.
        आराखडा तयार करताना मागील आराखड्यातील शिल्लक कामे, गावाच्या आणखी गरजा, आवश्यकता,  गावक-यांचे पुढील नियोजन यांचा विचार करुन ग्रामसभेमध्ये प्राधान्यक्रम निश्चित करावयाचा आहे.ग्रामपंचायतीने पुढील पाच वर्षामध्ये  उपलब्ध  स्त्रोतामधुन (ग्रामनिधी) प्राप्त होणा-या उत्पन्नाच्या/ निधिच्या दुप्पट/दिडपट रक्कमेचा आराखडा न करता  मुळ तरतुदीप्रमाणे आराखडा तयार करावा.परंतु 15 वा वित्त आयोगाच्या पाच वर्षामध्ये मिळणा-या निधीच्या दुप्पट पंचवार्षिक आराखडा व दिडपट वार्षिक आराखडा करावयाचा आहे.
पुर्वतयारी:-
ग्रामसभा 
1.ग्रामसभा नियोजन
1.1  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती गणनिहाय विस्तार अधिकारी यांची नेमणुक प्रभारी अधिकारी म्हणुन करणे तसेच प्रत्येक गणनिहाय मुख्यसेविका (ए.बा.वि.प्र) यांना प्रशिक्षित करणे.
1.2. ग्रामसभेमध्ये  आराखड्याबाबत चर्चा करताना खालीलप्रमाणे माहिती देणे आवश्यक आहे.
1.ग्रा.पं ने आतापर्यंत हाती घेतलेली कामे/उपक्रम,        त्यावर झालेला खर्च,शिल्लक निधी
2.पंचायतीस पुढील पाच वर्षात मिळणारे उत्पन्न व        इतर निधी.
3.यापुर्वी ग्रामसभेने सुचविलेली कामे/उपक्रम-            प्राधान्यक्रम.
4.गावाच्या गरजा, अडचणी यावरील               उपाययोजना.
5.केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची    अंमलबजावणी.
6.म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनांतर्गत चालु कामे/पुढील नियोजन.
                इत्यादीबाबत अद्यावत माहिती गोळा करणे व नियोजन करणे.
1.3  शासनाच्या विविध विभागाच्या अधिका-यांनी ग्रामसभेत उपस्थित राहुन आपल्या योजनांची माहिती देणेसाठी त्यांना आमंत्रित करणे.
1.4  शासनाच्या विविध विभागाच्या अधिका-यांनी ग्रामसभेत उपस्थित राहुन ग्रामसभेत द्यावयाची माहिती.
1.ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या विभागामार्फत चालु वर्षी घेतलेल्या योजना/उपक्रमांची
सद्यस्थिती.
2.विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजना.
3.ग्रा.पं मध्ये राबविलेल्या योजना, त्यांची सद्यस्थिती, उपलब्ध निधी व त्यामधील
अडचणी/त्रुटी.
4.योजनांमध्ये लोकांचा सहभाग.
5.योजनांच्या अमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीकडुन आवश्यक सहभाग.

1.5  ग्रामसभेमध्ये सर्व घटकांनी उपस्थित राहणेसाठी ग्रामसभेची प्रसिध्दी सर्व वाड्यांमध्ये करणे.
1.6  ग्रा.पं मार्फत राबविण्यात येणा-या योजना/उपक्रमांची माहिती तसेच ग्रा.प कडुन हाती घेण्यात आलेल्या योजना व उपक्रम यांची परीपुर्ण माहिती दर्शविणारे फलक गावामध्ये ठळक ठिकाणी लावणे.
1.7  पंचवार्षिक आराखडा व वार्षिक आराखडा करणेसाठी च्या ग्रामसभा दिनांक- 02 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करावयाच्या आहेत.
1.8  ग्रामसभेसाठी मा.गटविकास अधिकारी यांनी संपर्क अधिकारी यांची नेमणुक करणे.
2. महिला सभा, मागासवर्गीय व वंचित घटकांची सभा व बालसभा
        ग्रामसभेच्या आदल्या दिवशी या तीन सभा घेणेत याव्यात.
2.1 महिला सभा:-
       महिला सभा घेताना खालीलप्रमाणे विषयांवर चर्चा करणे आवश्यक आहे.
            1.ग्रामपंचायत विकास आराखडा चर्चा करणे
        2.राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटांनी          
       केलेल्या सुक्ष्म पत आराखडा.
3.ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणा-या विविध योजना व सेवांच्या अंमलबजावणीमध्ये  
स्वंयसहाय्यता गट/योजनांचा सहभाग    
4.ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करताना वातावरण निर्मिती, जाणीव जागृती व
क्षमता बांधणीसाठी स्वयंसहाय्यता गट व महिलांचा सहभाग
5.महिला, बालके, स्वयंसहाय्यता गट यांच्या समस्या, अडचणी व त्या सोडविण्यासाठी
उपाययोजना.
2.2  गावातील मागासवर्गीय व वंचित घटकांची सभा:-
         वंचित घटक, मागासवर्गीय, विधवा व परितक्ता महिला, अपंग, शेतमजुर यांच्या सभा घेणे. त्यांच्या समस्या, अडचणी, गरजा व यावर उपाययोजनांवर चर्चा करणे.
2.3 बालसभा:-
1. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची सभा घेऊन शिक्षण, आरोग्य,स्वच्छता, पिण्याचे पाणी, विविध स्वरुपाचे दाखले इत्यादी बालकांविषयीच्या सर्व गरजा व मागण्या यावर चर्चा करणे.
2.बालविवाह, बालमजुर, बालशोषण, बालहिंसा यापासुन संरक्षण करण्याबाबतच्या
उपाययोजना.
3.पुर्व प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा व त्यापुढील शिक्षणाच्या सोयी.
4. गावातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर महिलांच्या पोषणाबाबत
आवश्यक ती उपाययोजना.
वरीलप्रमाणे 1 व 2 मुद्यांच्या अनुषंगाने परीपुर्ण माहितीसह मुख्य ग्रामसभेचे नियोजन करण्यात यावे व आमचा गाव आमचा विकासउपक्रमांतर्गत सन 2020-21 ते 2024-25 पंचवार्षिक आराखडा व सन 2020-21 वार्षिक आराखडा तयार करणेत यावा.
प्रत्यक्ष आराखडा तयार करणे त्याचा प्राधान्यक्रम ठरविणे याबाबतची माहिती यापुढील पोस्ट मध्ये देण्यात येईल. तर मित्रानो  आपल्या माहितीत भर घालण्यासाठी व नेहमी अपडेट राहण्यासाठी  सर्च करा https://gramsevakmitra.blogspot.com    ग्रामसेवक मित्र  या ब्लॉगला  follow 🔔 करा  आणि ब्लॉग आवडल्यास comments ☝☝☝ करा.
धन्यवाद !! 😃😃